MHA Orders : गृह मंत्रालय लेह हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करणार; निवृत्त न्यायमूर्ती बीएस चौहान यांना जबाबदारी
२४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने शुक्रवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बीएस चौहान यांच्याकडे निष्पक्ष चौकशीचे नेतृत्व करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. चौकशी समिती पोलिसांच्या कारवाईची आणि चार लोकांच्या मृत्यूची कारणे तपासेल.