JP Infratech : 14,599 कोटींचा घोटाळा; जेपी इन्फ्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक अटकेत, खरेदीदारांचे पैसे जेपी सेवा ट्रस्टला पाठवले
१४,५९९ कोटींच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रिअल इस्टेट कंपनी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची ईडी काेठडी सुनावली. जेपी समुहातील कंपन्या जेएएल, जेआयएल यांनी घर खरेदीदारांकडून १४,५९९ कोटी रुपये वसूल केले. यातील मोठी रक्कम बांधकामाऐवजी जेपी सेवा संस्थान ट्रस्ट, जेपी हेल्थकेअर लिमिटेड व जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सारख्या इतर समूह कंपन्या आणि ट्रस्टमध्ये वळवण्यात आली. मनोज गौर हे जेएसएसचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. यामुळे अपूर्ण प्रकल्प आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.