John Bolton : युद्धविरामाचे श्रेय घेणाऱ्या ट्रम्प यांना घरचा आहेर, माजी NSA म्हणाले- त्यांना श्रेय घेण्याची सवय! ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी बुधवारी फेटाळून लावला. “ही ट्रम्प यांची सवय आहे, ते प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेऊ इच्छितात,” असे बोल्टन म्हणाले.