Sonam Wangchuk, : सोनम वांगचुक यांच्यावर NSA, अटक करून जोधपूर तुरुंगात नेले; लेहमध्ये सलग चौथ्या दिवशी कर्फ्यू
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी दुपारी त्यांच्या उल्याक्टोपो या गावात पोलिसांनी अटक केली. त्यांना राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात विमानाने नेण्यात आले. वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो जामिनाविना दीर्घकाळ ताब्यात ठेवण्याची परवानगी देतो.