Nitish Kumar : नितीश कुमार यांची मोठी घोषणा- लवकरच 50 लाख नोकऱ्यांचा आकडा पार होणार, निवडणूक जिंकल्यास 1 कोटी रोजगार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटणा जिल्ह्यातील पालीगंज भागात आयोजित दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सिकारिया गावात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले, तर दुल्हिन बाजार ब्लॉकमधील लाला भन्सारा गावात त्यांनी जननायक करपुरी ठाकूर पुस्तकालय भवनाचे उद्घाटन केले