Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, म्हणाले- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आतापर्यंत झाले नाही असे आंदोलन छेडणार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचे ते म्हणालेत. एवढेच नाही तर कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय नोकर भरती न करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगे व सरकारमधील वाक्युद्ध एका नव्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.