Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.