जमात ए इस्लामीच्या 215 शाळा जम्मू – काश्मीर सरकारच्या ताब्यात; मेहबूबा मुफ्तींना का झाली पोटदुखी??
केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घातलेल्या जमात ए इस्लामी संघटनेच्या 215 शाळा केंद्र सरकारने बंद केल्या होत्या. जम्मू काश्मीर मधल्या विद्यार्थ्यांना इस्लामी कट्टरपंथाकडे ढकलण्याची प्रक्रिया थांबवली होती. त्याचे चांगले परिणाम गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिसले. जम्मू काश्मीर मधला फुटीरतावाद कमी झाला. विद्यार्थ्यांमधली विष पेरणी कमी झाली. काश्मीर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 215 शाळा बंद ठेवल्या. परंतु, त्याचा वेगळा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष देखील व्हायला लागले. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी जम्मू-काश्मीरमधल्या उमर अब्दुल्ला सरकारने केंद्र सरकारच्या पाठिंब्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.