JK Assembly : J&K विधानसभेत NC-BJP आमदारांत हाणामारी; पुरावर चर्चा करायची होती, सभापतींनी परवानगी नाकारली
गुरुवारी जम्मू आणि काश्मीर विधानसभेत विरोधी पक्षाच्या भाजप आमदारांची एनसी आमदारांशी हाणामारी झाली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप नेते उभे राहिले आणि त्यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली. त्यांनी जम्मूच्या पूरग्रस्त भागांवर अर्धा तास चर्चा करण्याची मागणी केली. तथापि, सभापती अब्दुल रहीम राथेर यांनी भाजप आमदारांना प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याची विनंती केली.