Jharkhand : झारखंडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई; पोलिसांनी घेराव घालून ६ जणांना केली अटक
झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात सहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व नक्षलवादी थर्ड कॉन्फरन्स प्रेझेंटेशन कमिटी (टीएसपीसी) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित होते. नारायण भोक्ता उर्फ आदित, आलोक यादव उर्फ अमरेश यादव, अमित दुबे उर्फ छोटे बाबा, महेंद्र ठाकूर, इम्रान अन्सारी आणि संजय अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत