Jeffrey Epstein : एपस्टीन सेक्स स्कँडल फाइल्समध्ये ट्रम्प यांचा फोटो पुन्हा अपलोड; यात मेलानिया ट्रम्प यांचाही फोटो
अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित कागदपत्रांमध्ये समाविष्ट असलेली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे पुन्हा जारी केली आहेत. यात मेलानिया ट्रम्प यांचेही छायाचित्र आहे. विभागाने म्हटले आहे की, या छायाचित्रात एपस्टीन प्रकरणातील कोणत्याही पीडितेला दाखवण्यात आलेले नाही.