JD Vance’ : नेतान्याहूंना अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा? जे. डी. व्हान्स यांच्या लेबनॉन भूमिकेमुळे इस्रायलची चिंता वाढली
पश्चिम आशियातील बदलत्या घडामोडींमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी केलेल्या विधानांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर नवी कोंडी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण, लेबनॉन आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर बोलताना व्हान्स यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली असून त्यातील काही मुद्दे इस्रायलच्या भूमिकेशी विसंगत मानले जात आहेत.