JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स जयपूरला येण्याची शक्यता; आमेर आणि जंतरमंतरला भेट देऊ शकतात
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड (JD) व्हॅन्स हे त्यांच्या भारत भेटीदरम्यान (२१ ते २४ एप्रिल) जयपूरला भेट देऊ शकतात. त्यांच्या भेटीमुळे जयपूरमध्ये सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. गेल्या २४ तासांत जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन हवाई दलाची दोन विमाने उतरली आहेत.