Jayashree Patil : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील भाजपमध्ये
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही घडामोड अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे बोलले जात आहे.