Javed Akhtar : जावेद अख्तर-कंगना रनौतमध्ये तडजोड; 5 वर्षांनंतर मानहानीचा खटला मागे, सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने केले होते आरोप
प्रसिद्ध अभिनेत्री तथा भाजप खासदार कंगना रनौत व ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांच्यात ५ वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर अखेर पडदा पडला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली. या दोघांनीही तडजोड करून मानहानीचा खटला मागे घेतला.