Jarange Patil : जरांगे म्हणाले- मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटम मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी सोमवारी दिला. आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत २९ तारखेपासून आपण व मराठा कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.