Devedra Fadanvis : हातात बंदूक घेऊन व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्यांविरुद्ध जनसुरक्षा विधेयक, मुख्यमंत्र्यांची माहिती
देशात मोठ्या प्रमाणात काही राज्ये ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा कडवी डावी विचारसरणीग्रस्त आहेत. विचारांनी प्रेरित होऊन अनेक लोक हातात बंदूक घेऊन संविधानाने उभ्या केलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारत आहेत. याच नक्षलवादाला आळा घालण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार आपण जनसुरक्षा विधेयक आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.