Pawan Kalyan : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणाले- तेलुगू आई तर हिंदी मावशी; साऊथ चित्रपट हिंदीत डब करून कमावतात, हा कसला दुटप्पीपणा?
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण म्हणाले की, जर तेलुगू भाषा आपल्या आईसारखी असेल तर हिंदी ही मावशीसारखी आहे. हिंदी शिकल्याने प्रादेशिक अस्मितेला धोका निर्माण होत नाही. ती भारताला एकत्र करते. याकडे एक नवीन संधी म्हणून पाहिले पाहिजे.