Jammu and Kashmir, : जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू; धार्मिक यात्रेसाठी लोक आले होते, अनेक जण गेले वाहून
गुरुवारी दुपारी १२:३० वाजता जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात ढगफुटी झाली. डोंगरावरील पाण्यात आणि ढिगाऱ्यात अनेक लोक अडकले. या अपघातात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे. तर, १०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.