Jammu : जम्मूच्या बाल निरीक्षण केंद्रातून 3 कैदी फरार; यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक
जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमधील बाल निरीक्षण केंद्रातून सोमवारी संध्याकाळी तीन कैदी पळून गेले. कैद्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्लाही केला, ज्यात दोन पोलिस जखमी झाले.