Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर पोलिसांनी पहिल्यांदाच WhatsAppद्वारे e-FIR नोंदवला!
साधारणपणे तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जावे लागते, पण जर तुम्हाला सांगितले गेले की आता तुम्ही घरी बसून तक्रार दाखल करू शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे, आता जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या दिशेने एक पाऊल उचलले आहे आणि पहिला ई-एफआयआर नोंदवला गेला आहे.