जामखेड मध्ये निधी आला प्रचंड, पण एकमेकांचे पाय खेचण्याच्या नादात जनतेचे नुकसान; एकनाथ शिंदेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.