Udaipur Files : कन्हैयालाल हत्याकांडावर बनलेल्या चित्रपटावर दिल्ली हायकोर्टाची बंदी; याचिकाकर्त्याने 2 दिवसांत केंद्राकडे आक्षेप नोंदवावा
दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध उदयपूर कन्हैयालाल हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांच्यासह तीन याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अनिश दयाल यांच्या खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर अंतरिम स्थगिती दिली.