‘तणावपूर्ण संबंध कोणासाठीही फायदेशीर नाहीत’ ; जयशंकर यांचं चीनबद्दल विधान!
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि भारत यांच्यातील संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. २०२० मध्ये गलवान व्हॅली संघर्षानंतर सुरू असलेल्या तणावानंतर दोन्ही देश त्यांचे संबंध पुन्हा स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले. तणावपूर्ण संबंध कोणत्याही देशासाठी फायदेशीर ठरणार नाहीत असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.