होर्मूजच्या खाडीतून तेल – गॅस वाहतूक करायला भारतीय जहाजांना इराणची परवानगी; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची मुत्सद्देगिरी कामी आली!!
आखाता मधल्या होर्मूजच्या खाडीतून प्रवास करायला भारतीय जहाजांना इराणने परवानगी दिली. त्यामुळे आखातामधून भारताकडे येणाऱ्या गॅस आणि तेलाची वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मुत्सद्देगिरी यासाठी कामी आली.