Jaipur : जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल, चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा
जयपूर बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. जयपूर बॉम्बस्फोटातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिवंत बॉम्ब जप्त केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश रमेश कुमार जोशी यांनी ४ एप्रिल रोजी सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. सुमारे १७ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान सापडलेल्या जिवंत बॉम्ब प्रकरणात चार दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.