Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका
पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या वादग्रस्त जमीन व्यवहाराबाबत मुंबईत धर्मादाय आयुक्तांपुढे महत्त्वाची सुनावणी होणार आहे. जैन समाजाने या व्यवहाराची संपूर्ण चौकशी करून तो पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांनी या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत धर्मादाय आयुक्तांना थेट आवाहन केले आहे की, ही जमीन जैन समाजाची आहे, आणि तिचा व्यवहार हा चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार रद्द करून न्याय द्यावा.