Jain Monk : कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा; म्हणाले – धर्माविरोधात जाल, तर कोर्टालाही मानणार नाही
मुंबईतील कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवल्यानंतर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाचा आदेश लागू असूनही अलीकडेच दादर कबुतरखान्याजवळ काही जैन बांधवांनी कबुतरांना धान्य टाकले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. या कारवाईनंतर जैन समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून, 13 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार आहेत. तर वेळ पडल्यास शांतताप्रिय असणारा आमचा समाज शस्त्रंही हातात घेईल आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नसल्याचा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.