Sheikh Hasina : बांगलादेशात शेख हसीना यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी आढळल्या
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. द डेली स्टार या बंगाली वृत्तपत्रानुसार, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (आयटीसी) बुधवारी ही शिक्षा सुनावली. हसीना आणि स्थानिक नेते शकील बुलबुल यांच्यातील फोन संभाषणाची चौकशी केल्यानंतर आयटीसीने हा निर्णय दिला.