Sambhal : संभलमध्ये ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत पहिल्यांदाच निघाली शोभायात्रा!
यावेळी उत्तर प्रदेशातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या संभलमध्ये रामनवमीचे दृश्य वेगळे होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दंगलीचे फोटो चर्चेत होते, तर आता रस्त्यावरून शांतता, श्रद्धा आणि सौहार्दाचा संदेश देणारी भव्य मिरवणूक काढली जात होती. हा केवळ स्थानिकांसाठी एक नवीन अनुभव नव्हता तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक दिवस बनला.