Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आले मुख्यमंत्री; शरद पवारांच्या ‘जय कर्नाटक’ घोषणेची करून दिली आठवण
पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली.