Ajit Pawar : महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे; उद्योजकाच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.