Jabalpur : एमपीच्या जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, 6 मृतदेह सापडले; 15 हून अधिक बेपत्ता, 19 जणांना वाचवले
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १९ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.