Italy : इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी तोडफोड-जाळपोळ केली; 60 पोलिस जखमी; पॅलेस्टाईनला मान्यता न दिल्याबद्दल संताप
पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांच्या सरकारने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर इटलीमध्ये हजारो लोक हिंसक निदर्शने करत आहेत.सोमवारी निदर्शने सुरू झाल्याने मिलानसह अनेक प्रमुख शहरांमध्ये रस्ते रोखण्यात आले आणि बंदरे बंद करण्यात आली. मिलान आणि राजधानी रोममध्ये सर्वात जास्त गर्दी दिसून आली.