Israels : पाच दिवसांत दुसऱ्यांदा CDS ठार, इस्रायलचा इराणला मोठा झटका!
इस्रायली सैन्याने (आयडीएफ) मंगळवारी दावा केला की त्यांनी एका मोठा इराणी कमांडर अली शादमानीला ठार मारले आहे. इस्रायलने त्याचे सैन्य प्रमुख म्हणून वर्णन केले आहे. हा हल्ला एका मोठ्या कारवाईनंतर झाला आहे, ज्यामध्ये इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणचे मेजर जनरल गुलाम अली रशीद यांनाही ठार मारल्याचा दावा केला होता.