India : भारत जर्मनीकडून 70 हजार कोटींत 6 पाणबुड्या खरेदी करणार; सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्रही घेणार
भारत सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिला करार संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड यांनी जर्मनीकडून ६ पाणबुड्या खरेदी करण्याचा आहे. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत भारतात बांधल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार ७० हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो.