Pakistan, Bangladesh : पाकिस्तान-बांगलादेशात 6 करारांवर स्वाक्षऱ्या; राजदूतांना व्हिसाशिवाय एकमेकांच्या देशांमध्ये भेट देता येईल
पाकिस्तान आणि बांगलादेशने रविवारी सहा करारांवर स्वाक्षरी केली. यामध्ये व्यापार, अर्थव्यवस्था, राजनैतिक प्रशिक्षण, शिक्षण, माध्यमे आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे समाविष्ट आहे.पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मुहम्मद इशाक डार आणि बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांच्यात झालेल्या प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेनंतर हे करार झाले.