Iranian : 2000 इराणी धर्मगुरूंची ट्रम्प यांच्या हत्येची मागणी; म्हणाले- ट्रम्प यांना मारणे हलाल, सुलेमानींच्या मृत्यूचा बदला प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य
इराणमधील २००० हून अधिक धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची उघडपणे मागणी केली आहे. या धर्मगुरूंनी ट्रम्प यांचे रक्त हलाल असल्याचे म्हटले आहे, म्हणजेच जर कोणी त्यांना मारले तर तो गुन्हा नाही.