इराण – अमेरिका युद्धाचा भारतावर दुष्परिणाम; पण त्याचबरोबर नव्या क्षेत्रांमध्ये झेप घ्यायची संधी; नवनिर्माणाच्या क्षेत्रात “चांदी”!!
कुठलेही युद्ध जसे मानवाला हानी पोहोचवते तसेच ते नवनिर्माणाच्या संधी सुद्धा निर्माण करते. असेच इराण विरुद्ध अमेरिका या युद्धात सुद्धा झाले. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे संपूर्ण जग इंधन टंचाईच्या विळख्यात लोटले गेले. भारतावर आर्थिक दुष्परिणाम झाला. भारतावर इंधन टंचाईचे वादळ घोंगावले. सर्वसामान्य भारतीयांना इंधन टंचाई बरोबरच महागाईला सामोरे जावे लागले. त्यातून रोजगाराच्या समस्या देखील उद्भवल्या. बचतीचे नवे मार्ग अवलंबायला लागले.