Iran Violence : इराण हिंसाचार- तेहरानमधील रुग्णालयासमोर प्रेतांचा ढिगारा, 15 दिवसांत 544 लोकांचा मृत्यू
इराणमध्ये गेल्या 15 दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वृत्तसंस्थेनुसार (HRANA), हिंसाचारात आतापर्यंत 544 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 8 मुलांचाही समावेश आहे. तर, 10,681 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.