Iran Deports : इराण अफगाण निर्वासितांना तपासणीशिवाय बाहेर काढतोय; मुलांना कुटुंबांपासून वेगळे केले, 100 दिवसांत 10 लाख स्थलांतरित
इराण अफगाण निर्वासितांना त्यांची कायदेशीर स्थिती तपासल्याशिवाय देशातून हाकलून लावत आहे. हा आरोप इराणी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनावर केला आहे. यामुळे चुकीची ओळख, कुटुंब वेगळे होणे आणि हद्दपारी दरम्यान गैरवापर अशा असंख्य घटना घडल्या आहेत. तेहरानचे गव्हर्नर मोहम्मद सादिक मोतामेदियन म्हणाले की, गेल्या १०० दिवसांत १० लाखांहून अधिक अफगाणिस्तानवासीयांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी ४ लाख जण एकट्या तेहरान प्रांतातील आहेत.