Iran attacks : इराणने कतार, इराक अन् बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर केला हल्ला!
इराणने कतार, इराक आणि बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने दावा केला आहे की हा हल्ला इराणने अमेरिकेवर पलटवार केलेला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वेगाने वाढत आहे. विशेषतः इराणी अणु तळांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वेगाने वाढत आहे. एकीकडे इस्रायल आणि इराणमधील युद्ध भयानक होत चालले आहे, तर आता इराण आणि अमेरिका आमनेसामने आहेत. या दरम्यान, कतारमधील अमेरिकन दूतावास रिकामा करण्यात आले आहे.