Iran Army Chief : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणच्या लष्करप्रमुखांचा लष्करी कारवाईचा इशारा; म्हणाले- शत्रूंना प्रत्युत्तर देऊ
इराणचे लष्करी कमांडर मेजर जनरल अमीर हातमी यांनी परदेशी धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच म्हटले होते की, जर इराणच्या सैन्याने शांततापूर्ण निदर्शकांवर हिंसा केली किंवा त्यांना मारले, तर अमेरिका हस्तक्षेप करण्यास तयार आहे.