Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पक्षाने (आप) दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्ली पक्षाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी ही माहिती दिली. २५ एप्रिल रोजी निवडणुका होतील.