India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते
भारतात आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनमधून ३०० हून अधिक चिनी अभियंते आणि तंत्रज्ञांना अचानक परत बोलावल्यानंतर भारत सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने म्हटले आहे की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. उत्पादनावर परिणाम न करता काम सुरू ठेवण्यासाठी ॲपलकडे पुरेसे अभियंते आहेत.