Jyoti Malhotra : हिसारची यूट्यूबर ज्योती तुरुंगातून बाहेर येणार नाही; जामीन अर्ज फेटाळला, कोर्टाने म्हटले- तपासावर परिणाम होऊ शकतो
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज हरियाणातील हिसार सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने निकालादरम्यान टिप्पणी केली की आरोपीची जामिनावर सुटका तपासात अडथळा आणू शकते.