Delhi Govt : दिल्लीतील दुकाने-ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम; राज्य सरकारची परवानगी; लेखी संमती आवश्यक
दिल्लीतील महिला कर्मचाऱ्यांना आता दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करता येईल. दिल्ली सरकारने गुरुवारी एक अधिसूचना जारी करून औपचारिक परवानगी दिली. तथापि, यासाठी महिला कर्मचाऱ्यांची लेखी संमती आवश्यक आहे.