Bangladesh : बांगलादेशात हसीना यांचे वक्तव्य छापण्यास बंदी, सरकारने माध्यमांना दिला कडक इशारा
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने देशातील सर्व माध्यमांना (प्रिंट, टेलिव्हिजन आणि ऑनलाइन) कडक इशारा दिला आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेले विधान प्रकाशित करू नये. सरकारने यामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण असल्याचे सांगितले आहे.