Insulin Awiqli : मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागेल; भारतात लॉन्च झाले जगातील पहिले बेसल इन्सुलिन
डेन्मार्कची औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने बुधवारी भारतात Awiqli (इन्सुलिन आयकोडेक) लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन आहे, जे टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याच्या आगमनाने दररोज घ्यावे लागणारे 365 इन्सुलिन इंजेक्शन वर्षाला 52 पर्यंत कमी होतील.