CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांची घोषणा- गुणवत्तापूर्ण बियाणे; कृषी यंत्रणा सक्षम करणार, विभागाला तपासणीचे अधिकार
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.